Ad will apear here
Next
‘पूर परिस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत’
डॉ. दीपक मोडक यांचे प्रतिपादन
डॉ. दीपक मोडक भाषण करताना

पुणे : ‘धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरणे बांधायला विरोध करतात; परंतु धरणेच बांधली गेली नाहीत, तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार? त्यामुळे धरणे बांधणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य अभियंता आणि धरण सुरक्षा समितीचे सदस्य डॉ. दीपक मोडक यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग, दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलच्या वतीने आयोजित व्याख्यानात ‘धरणांद्वारे पूर नियंत्रण-मिथक आणि सत्य’ या विषयावर डॉ. दीपक मोडक बोलत होते. शिवाजीनगर येथील दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ उपस्थित होते.

डॉ. दीपक मोडक म्हणाले, ‘यंदा सगळीकडे एकदाच पाऊस पडल्यामुळे अनेक धरणांतून पाणी सोडावे लागले आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी नदीपात्रात माती, राडारोडा, अवैध बांधकाम केल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातून पात्रातील पाणी बाहेर येते व पूर परिस्थिती निर्माण होते; तसेच नदीच्या पात्राच्या शेजारी ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते यामुळेही पाण्याला अडथळा होतो. बंधारे किंवा पूल बांधताना नदी प्रवाहाला अडथळा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. धरणाची उंची वाढवून, पुरशोषण क्षमता निर्माण करता येते का याचा अभ्यास करायला हवा.’

प्रास्ताविकामध्ये प्रा. राजेंद्र सराफ म्हणाले, ‘ब्रिटीश काळातही अनेक धरणे बांधली गेली आहेत. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे आपल्या जीवनात धरणे महत्त्वाची भूमिका बजावतात.’

सूत्रसंचालन विनय र. र. यांनी केले. शोभा नहार यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZTNCE
Similar Posts
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेमध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांचे ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,
‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे ‘मौखिक कर्करोग’ या विषयावर डॉ. अंकित शहा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. दिनांक : १९ मे २०१७ वेळ : सायंकाळी सहा वाजता स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन, सेमिनार हॉल, नवी पेठ,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language